वाढत्या उन्हाळ्यात वाढणाऱ्या केसांच्या समस्या कोणत्या ?
काळजी काय घ्यावी ? निगा कशी राखावी ? या विषयी...
- डॉ.राजेंद्र कमानकर (सिन्नर)
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे केस ओले राहणाचे प्रमाण जास्त असते. घामामुळे केस चिकट व खराब झाल्यासारखे जाणवतात. त्यामुळे ह्या दिवसांत केस धुण्याचे प्रमाण वाढते. परंतु जास्त वेळा धुतल्यामुळे केस निस्तेज वाटू लागतात. हे टाळण्यासाठी केस धुण्याच्या आधी तेलाचा वापर करावा. तेलाचा उपयोग केसांमधील आर्द्रता राखण्यासाठी, केसांवर चमक येण्यासाठी व केशतंतू मजबूत होण्यासाठी होतो. त्यामुळे केस धुण्याच्या किमान एक तास आधी केसांना खोबऱ्याचं तेल लावावं.
सध्या बाजारात मिळणारे बरेचसे शाम्पू केमिकल (रसायन) सल्फेट मिश्रित असतात. ह्या रसायनांमुळे केसांची मुले कोरडी होऊन कमकुवत होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी रसायन आणि सल्फेट मुक्त शाम्पू वापरावा. श्यक्यतो केसांना नैसर्गिक घटकांनी युक्त शाम्पू व कंडिशनर लावावं. आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा केसांना शाम्पू लावू नये.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. सूर्याच्या अति नील किरणांचा त्वचेप्रमाणे केसांवरही परिणाम होतो व केसांतील आर्द्रता कमी होऊन केस रुक्ष व कमजोर होतात. त्यामुळे बाहेर जाताना केस रुमाल, कॅप किंवा स्कार्फ नं झाकलेले असावेत. श्यक्यतो केसांना झाकण्यासाठी सूती कपड्याचा वापर करावा. यामुळे केसांचं उन्हापसून संरक्षण तर होतंच सोबतच केसांना गारवाही मिळतो. केसांचं संरक्षण व्हावं या हेतूनं सध्या बाजारात मिळणाऱ्या यूवी फिल्टर स्प्रे, जेल वा क्रीम यांचा वापर टाळावा. कारण हेही केमिकल मिश्रित असतात.
नियम क्र. ४ हिटिंग टूल्स नकोच...
केसांच्या विविध स्टाईल्स करण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या हेयर स्ट्रेटनेर, ब्लोअर, ड्रायर या हिटिंग टूल्सचा केसांवर मोठा दुष्परिणाम दिसून येतो. हिटिंग टूल्स वारंवार वापरल्यास केसातील कोरडेपणा वाढून केस निस्तेज होतात व कमजोर होऊन तुटू लागतात.दिसतात.
नियम क्र. ५ उन्हाळ्यातील केशरचना...
उन्हाळ्यात केस धुवायचे असल्यास ते रात्री झोपण्यापूर्वी धुवावेत. त्याचप्रमाणे केस सुकवणंही तितकच महत्वाचं आहे. चांगले सुकल्यानंतर केस सैलसर बांधावेत. उन्हाळ्यात श्यक्यतो केशरचना सैलसरच असावी. केस करकचून बांधल्यामुळे मुळांवर ताण येऊन केस कमजोर होतात. तसेच घट्ट बांधलेल्या केशरचनेमुळे केसांमधील घाम लवकर न सुकल्यामुळे कोंडा / बुरशी होण्याची शक्यता असते.
नियम क्र. ६ सुदृढ व पुरेसा आहार गरजेचा...
केसांची वरुन काळजी घेणं जितकं गरजेचं आहे तितकंच केसांना आहाराद्वारे पोषण मिळणंही महत्त्वाचं असतं. त्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त डाळी, सुकामेवा इत्यादींचा अंतर्भाव गरजेचा आहे. या अन्नपदार्थातून केसांच्या पोषणासाठी आवश्यक असणारे लोह, बीटा केरोटीन, बायोटिन, अ जीवनसत्व आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळतात व केस दाट आणि मजबूत होतात. पुरेशी झोप तसेच मनःशांती, कमीत कमी ताणतणाव हे हि तितकेच गरजेचे आहे. विविधप्रकारच्या योगासनांच्या मदतीने वरील समस्यांवर आपण मात करू शकतो. केसांचं पोषण होवून केस मजबूत होण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, सोयाबीन, रताळी, सुकामेवा या अन्न पदार्थांची आवश्यकता असते. या अन्नपदार्थातून केसांच्या पोषणासाठी आवश्यक लोह, बीटा केरोटीन, अ जीवनसत्व आणि ओमेगा 3 हे महत्वाचे घटक मिळून केस दाट आणि मजबूत होतात.
पुरेशी झोप तसेच मनःशांती, कमीत कमी ताणतणाव हे हि तितकेच महत्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी आपल्याला किमान ७ तासांची झोप गरजेची असते. पुरेशी झोप झाल्याने चिडचिड , आळस, नैराश्य इत्यादी समस्या कमी होतात. विविधप्रकारच्या योगासनांच्या मदतीने शरीरातील परिणामी मेंदूतील रक्ताभिसरण चांगले होते तसेच शरीरातील विविध संप्रेरकांची पातळी नियमित ठेवण्यासाठी सुद्धा योगासनांची मदत होते. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे केस मजबूत व निरोगी होतात.







Comments
Post a Comment