वाढत्या उन्हाळ्यात वाढणाऱ्या केसांच्या समस्या कोणत्या ? काळजी काय घ्यावी ? निगा कशी राखावी ? या विषयी... - डॉ.राजेंद्र कमानकर (सिन्नर) आपले केस सुंदर, निरोगी असावेत असं सर्वानाच वाटतं पण त्यासाठी विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. केसांच्या आरोग्यावर प्रदूषण, वातावरण, खाणंपिणं या बरोबरच कडक व तीव्र उन्हाळाही परिणाम करतो. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला काही नियम पाळणे गरजेचे असते. नियम क्र. १ तेलाचा वापर करा.... उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे केस ओले राहणाचे प्रमाण जास्त असते. घामामुळे केस चिकट व खराब झाल्यासारखे जाणवतात. त्यामुळे ह्या दिवसांत केस धुण्याचे प्रमाण वाढते. परंतु जास्त वेळा धुतल्यामुळे केस निस्तेज वाटू लागतात. हे टाळण्यासाठी केस धुण्याच्या आधी तेलाचा वापर करावा. तेलाचा उपयोग के सांमधील आर्द्रता राखण्यासाठी, केसांवर चमक येण्यासाठी व केशतंतू मजबूत होण्यासाठी होतो. त्यामुळे केस धुण्याच्या किमान एक तास आधी केसांना खोबऱ्याचं तेल लावावं. नियम क्र. २ शाम्पू चा वापर जरा जपूनच... सध्या बाजारात मिळणारे बरेचसे शाम्पू केमिकल (रसायन) सल्फेट मिश्रित असतात. ...