Skip to main content

तणावमुक्त रहा ! केस गळणे थांबवा !!

तणावमुक्त रहा ! केस गळणे थांबवा !!

डॉ.राजेंद्र कमानकर, सिन्नर (नाशिक)

मानसिक तणावाचा शारीरिक आरोग्याबरोबरच केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो याची आपल्याला कल्पना नसते. किंबहुना तणावाचा परिणाम व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावरही होतो. याचा अर्थ असा नाही की तणाव नेहमीच वाईट असतो. कधीकधी काही व्यक्ती तणावाखाली अनेक चांगले निर्णय घेऊ शकतात किंवा नेहमीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. एखाद्या विशिष्ट स्तरापर्यंतचा ताण जरी चांगला असला तरी किती तणाव चांगला आहे याचा काही निश्चित मापदंड नाही.

Telogen Effluvium हे केसांचे अशा प्रकारचे नुकसान आहे की जे अचानक वाढलेल्या ताणामुळे उद्भवते. अतिरिक्त तणावामुळे केसांची मुळे किंवा रंध्रे निद्रिस्त अवस्थेत जातात. काही महिन्यांनंतर ती निष्क्रिय होऊन केस गळू लागतात. तणावग्रस्त परिस्थिती उद्भवल्यानंतर साधारण २ ते ३ महिन्यांनी केस गळती दिसून येते. त्यामुळे केसगळतीचे कारण तणावच आहे हे समजणे कठीण होते.  

दररोज सुमारे १०० केस गळणे सामान्य मानले जाते. परंतु तणावग्रस्त परिस्थितीत हेच प्रमाण जवळजवळ ३०० ते ४०० केसांपर्यंत जाऊ शकते. अशा तात्पुरत्या केसगळती साठी काही विशिष्ट औषधोपचार घेणे गरजेचे नसते. तणाव निवळला की केस गळती थांबू शकते.  ज्याप्रमाणे प्रत्येक समस्येचे निराकरण होणे गरजेचे आहे त्याप्रमाणे केस गळती थांबविण्यासाठी तणावाच्या समस्येचे निराकरण होणे सुद्धा गरजेचे आहे.

आपल्या तणावाची पातळी कमी करण्यासाठी खाली दिलेल्या काही उपयुक्त गोष्टी आपण नक्की करू शकता.

    १. व्यायाम करा.  

आपल्या शरीरात Adrenalin नावाचे संप्रेरक तयार होत असते जे शरीराच्या विविध महत्वाच्या क्रिया नियंत्रित करते. परंतु अतिप्रमाणात तयार झालेले Adrenalin तणाव वाढविते व अचानक केस गळती सुरू होते. 

नियमित शारीरिक व्यायाम केल्याने Adrenalin चे प्रमाण नियंत्रित राहते व आपण तणावमुक्त राहू शकता. 


२. पुरेशी व शांत झोप घ्या, आराम करा.

पुरेशी व चांगली झोप घेण्यासाठी आपल्याला काही विशेष तंत्राची आवश्यकता भासत नाही. केवळ आपल्याला एक शांततापूर्ण, स्वच्छ व प्रसन्न जागा हवी आहे. 

शांत झोप ही तणावमुक्ती साठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या ओफिसच्या किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण दररोज किमान १५ मिनिटे विश्रांती घेणे गरजेचे आहे. नियमित शारीरिक कसरती केल्याने सुद्धा शांत झोप लागण्यास मदत होते.  मनावरील ताण कमी झाल्यास केस गळणे आपोआप कमी होईल.

   ३. चांगला आहार घ्या.

प्रथिने (Proteins), जीवनसत्वे (Vitamins) आणि खनिजयुक्त पदार्थ (Minerals) इत्यादीनी स्वयंपूर्ण असलेला आहार घ्या

बेकरी पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळा. कृत्रिम साखर टाळलेलीच बरी. दूध, हिरव्या पालेभाज्या, ज्या ज्या ऋतु मध्ये जी जी फळे मिळतात ती खा. अंडी व मांसाहाराचा सुद्धा आपल्या आहारमध्ये समावेश करू शकता. पोषक व स्वयंपूर्ण आहार निरोगी शरीराचे प्रतिक आहे.  

  वरील सर्व गोष्टी केल्याने आपल्याला निरोगी शरीरा सोबतच निरोगी केसही लाभतील व आपल्या आत्मविश्वासात भर पडेल हे नक्की.  

डॉ. राजेंद्र कमानकर. सिन्नर (नाशिक)

मो. 9823312588 

 

Comments

Post a Comment