Skip to main content

Posts

उन्हाळा आणि केसांची काळजी !

वाढत्या उन्हाळ्यात वाढणाऱ्या केसांच्या समस्या कोणत्या ?  काळजी काय घ्यावी ? निगा कशी राखावी ? या विषयी...  - डॉ.राजेंद्र कमानकर (सिन्नर) आपले केस सुंदर, निरोगी असावेत असं सर्वानाच वाटतं पण त्यासाठी विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. केसांच्या आरोग्यावर प्रदूषण, वातावरण, खाणंपिणं या बरोबरच कडक व तीव्र उन्हाळाही परिणाम करतो. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला काही नियम पाळणे गरजेचे असते. नियम क्र. १ तेलाचा वापर करा....  उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे केस ओले राहणाचे प्रमाण जास्त असते. घामामुळे केस चिकट व खराब झाल्यासारखे जाणवतात. त्यामुळे ह्या दिवसांत केस धुण्याचे प्रमाण वाढते. परंतु जास्त वेळा धुतल्यामुळे केस निस्तेज वाटू लागतात. हे टाळण्यासाठी केस धुण्याच्या आधी तेलाचा वापर करावा. तेलाचा उपयोग के सांमधील आर्द्रता राखण्यासाठी, केसांवर चमक येण्यासाठी व केशतंतू मजबूत होण्यासाठी होतो. त्यामुळे केस धुण्याच्या किमान एक तास आधी केसांना खोबऱ्याचं तेल लावावं.  नियम क्र. २ शाम्पू चा वापर जरा जपूनच...  सध्या बाजारात मिळणारे बरेचसे शाम्पू केमिकल (रसायन) सल्फेट मिश्रित असतात. ...
Recent posts

तणावमुक्त रहा ! केस गळणे थांबवा !!

तणावमुक्त रहा ! केस गळणे थांबवा !! डॉ.राजेंद्र कमानकर, सिन्नर (नाशिक) मानसिक तणावाचा शारीरिक आरोग्याबरोबरच केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो याची आपल्याला कल्पना नसते . किंबहुना त णावाचा परिणाम व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावरही होतो . याचा अर्थ असा नाही की तणाव नेहमीच वाईट असतो . कधीकधी काही व्यक्ती तणावाखाली अनेक चांगले निर्णय घेऊ शकतात किंवा नेहमीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात . एखाद्या विशिष्ट स्तरापर्यंतचा ताण जरी चांगला असला तरी किती तणाव चांगला आहे याचा काही निश्चित मापदंड नाही . Telogen E ffluvium   हे केसांचे अशा प्रकारचे नुकसान आहे की जे अचानक   वाढलेल्या ताणामुळे उद्भवते . अतिरिक्त   तणावामुळे केसांची मुळे   किंवा रंध्रे निद्रिस्त अवस्थेत जातात. काही महिन्यांनंतर ती निष्क्रिय होऊन केस गळू लागतात. तणावग्रस्त परिस्थिती   उद्भवल्यानंतर साधारण २ ते ३ महिन्यांनी केस गळती दिसून येते. त्यामुळे केसगळतीचे कारण तणावच आहे हे समजणे कठीण होते.   दररोज सुमारे   १०० केस गळणे सामान्य मानले   जाते . परंतु तणावग्रस्त परिस्थितीत   हेच प्रमाण जवळजवळ ...