Skip to main content

Posts

Showing posts from 2021

तणावमुक्त रहा ! केस गळणे थांबवा !!

तणावमुक्त रहा ! केस गळणे थांबवा !! डॉ.राजेंद्र कमानकर, सिन्नर (नाशिक) मानसिक तणावाचा शारीरिक आरोग्याबरोबरच केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो याची आपल्याला कल्पना नसते . किंबहुना त णावाचा परिणाम व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावरही होतो . याचा अर्थ असा नाही की तणाव नेहमीच वाईट असतो . कधीकधी काही व्यक्ती तणावाखाली अनेक चांगले निर्णय घेऊ शकतात किंवा नेहमीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात . एखाद्या विशिष्ट स्तरापर्यंतचा ताण जरी चांगला असला तरी किती तणाव चांगला आहे याचा काही निश्चित मापदंड नाही . Telogen E ffluvium   हे केसांचे अशा प्रकारचे नुकसान आहे की जे अचानक   वाढलेल्या ताणामुळे उद्भवते . अतिरिक्त   तणावामुळे केसांची मुळे   किंवा रंध्रे निद्रिस्त अवस्थेत जातात. काही महिन्यांनंतर ती निष्क्रिय होऊन केस गळू लागतात. तणावग्रस्त परिस्थिती   उद्भवल्यानंतर साधारण २ ते ३ महिन्यांनी केस गळती दिसून येते. त्यामुळे केसगळतीचे कारण तणावच आहे हे समजणे कठीण होते.   दररोज सुमारे   १०० केस गळणे सामान्य मानले   जाते . परंतु तणावग्रस्त परिस्थितीत   हेच प्रमाण जवळजवळ ...